अँड्र्यू एच. नोल हे हार्वर्ड विद्यापीठातील फिशर प्राध्यापक (नॅचरल हिस्टरी) आहेत. त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत, जसे की रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसचा क्रॅफोर्ड पुरस्कार, इंटरनॅशनल प्राइज फॉर बायोलॉजी, नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेसचा चार्ल्स डूलिटल वॉल्कट मेडल आणि मेरी क्लार्क थॉम्पसन मेडल, पॅलिओन्टोलॉजिकल सोसायटी मेडल आणि लंडनच्या जिओलॉजिकल सोसायटीचा वोलास्टन मेडल. जवळपास दोन दशकांपासून ते नासाच्या मंगळ ग्रह संशोधनाच्या रोव्हर मोहिमेच्या विज्ञान संघाचा भाग होते. नोल यांनी लाइफ ऑन अ यंग प्लॅनेट हे पुस्तक लिहिले आहे, ज्यासाठी त्यांना विज्ञानामधील ‘फी बीटा कप्पा बुक अॅवॉर्ड’ मिळाला आहे.