महायोग परिवर्तनाचा-पसायदान

About The Book

ज्ञानाबद्दलच्या गैरसमजांमुळे लोक ज्ञानप्राप्तीसाठी खूप मेहनत करतात व बहुतेक लोक फक्त अधिकाधिक माहिती गोळा करणे ह्यामध्येच गुंतून राहिल्या कारणाने त्या अभ्यासाचे ओझे होऊ लागते व त्यामुळे आजार आणि विकार वाढू लागतात म्हणूनच अद्वैताच्या सर्व महात्म्यांनी हे टाळण्यास सांगितले आहे. अष्टवक्रगीतेच्या सोळाव्या अध्यायामध्येसुद्धा असे सांगितले आहे की 'स्वास्थ्यं सर्वविस्मरणादृते'. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींनी मानव जीवनाच्या उद्धारासाठी ज्ञान हे ओझं होऊ नये म्हणुन पसायदानाच्या फक्त ९ ओळींमधून सुंदर जीवनाचे संपूर्ण सार मांडले आहे.पसायदानाच्या ९ ओव्यांमध्ये जीवनातील सर्व स्तरांवरच्या समस्यांवर उत्तरे मिळतात. हे वाचल्यास संत ज्ञानेश्वर महाराजांची साधना व ऊर्जा या दोन्हींचे फळ आशीर्वाद स्वरूपात वाचणाऱ्यास सहज प्राप्त होते. या ९ ओव्यांमध्ये केवळ शब्दार्थच नाही तर गहन भावार्थाने पाहावयास हवे. जीवनात सहजता व समता शोधणाऱ्या सर्व लोकांसाठी हे अत्यंत मार्गदर्शक ठरेल. असा विश्वास वाटण्याचे कारण असे की ज्यांनी हे आत्मसात केले आहे ते समाधानी झाले आहेत.माऊलींचे पसायदान हे जरी फक्त ९ ओव्यांचे असले तरी त्याचा गहन अर्थ सागराप्रमाणे आहे संपूर्ण सार हे प्रत्यक्षात मांडणे शक्य नाही तरी जेवढे शक्य झाले आहे तेवढे प्रामाणिकपणे प्रयत्न केले गेले आहेत तरी सर्वांनी ते गोड मानून घ्यावे ही सुज्ञ वाचकानां नम्र विनंती. विभूश्री यांच्याबद्दल थोडेसे –ज्याप्रमाणे स्वतःचा पाया मजबूत बनवण्यासाठी एखादा वाहनचालक निष्णात प्रशिक्षकांपासून एक उत्तम चालक बनण्याचे धडे घेतो सुरक्षिततेचे नियम शिकतो रस्त्यावर वाहन चालवताना नियमन कसे करायचे ते शिकतो. त्याचप्रमाणे विभूश्रींच्या मार्गदर्शनाखाली पसायदान शिकणे हे अगदी तसेच आहे. याच शिष्यभावातून प्रसन्न संतुलित आणि शाश्वत अशी आपली वृद्धी होत राहते. - नादयोगी विभूश्री म्हणजेच पूर्वाश्रमीचे रिवेश वदे हे आयआयटी मुंबई येथून उत्तीर्ण झालेले संगणक व्यवस्थापन अभियंते आहेत.- मृत्युच्या अगदी जवळ जाण्याचा जो अनुभव त्यांना आला त्यातून त्यांनी २०१२ साली बोधमार्ग फौंडेशनची स्थापना केली.- टाईम्स ग्रुपने २०१७ साली त्यांचे नादयोगातील कौशल्य आणि नाद म्हणजेच 'ध्वनीचा' आपले कल्याण आणि अध्यात्म यावर जलदगतीने कसा परिणाम होत जातो याची दखल घेतली.- सध्याच्या धावपळीच्या युगात दैवी ज्ञानाचा समाजात शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रसार करणे हे त्यांचे ध्येय आहे.- युनेस्को – २२ च्या आमसभेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलण्याचा मान त्यांना मिळाला. त्यावेळी त्यांनी पसायदानातील 'ज्ञान' या विषयावर प्रकाश टाकला.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE