: हि एक दर्दभरी कहानी आहे. आईवडीलांची ईस्टेट आपल्याला मिळावी म्हणून भावाच्या मरणाची वाट पहात बसलेल्या स्वार्थी बहिणीची..... काहि वर्षापूर्वी आपल्यावर झालेल्या अन्यायामुळे जीवनाला कंटाळून व्यसनाधीन झालेल्या परंतु भाचीच्या लग्नातील मामेसोहळा करण्यासाठी जीवंत असलेल्या निस्वार्थी मामाची . .. .आपल्या वचनपुर्ततेसाठी आपल्या मुलीला एका बदमाश गुंडाच्या स्वाधीन करुन पित्याच्या कर्तव्यातून मुक्त होऊ पाहणाऱ्या अविचारी बापाची . . . आणि व्यसनाधीन झालेल्यास व्यसनमुक्त करण्यासाठी धडपड करणाऱ्या एका काँलेज कुमाराची .. . आईवडीलांचा विरोध असताना योग्य पतीची निवड करणाऱ्या तरूणीची ही कथा आहे. हया कथेतील नायक आहे मानसिक व्यथांपासून आराम मिळावा म्हणून व्यसनाधीन झालेला . . . काहि वर्षापूर्वी आपल्या बहिणीने आपल्या लग्नाला नकार दिला म्हणून आपलं लग्न झालं नाही ही ह्या नायकाची मानसिक व्यथा आहे. स्वार्थसाधू माणसं दुसऱ्याच्या भवितव्याचा विचार न करता झटकन निर्णय घेऊन मोकळी होतात आणि त्याचा परिणाम एका निर्व्यसनी माणसावर होऊन तो व्यसनाधीन होतो आणि पूर्वजन्मीच्या पापाचं प्रायश्चीत आणि पुण्यकर्माच फळ हे मिळतचं .. ... हया विचाराने एखादा निस्वार्थी माणूस व्यसनाधीन झालेल्या माणसाला कसं सहकार्य करतो . . . ह्या कथेत सांगितलेल आहे. आपल्या सहवासात आलेल्या माणसांच्या स्वभाव गुणांच चीत्र नजरेसमोर ठेऊन ह्या नाटकात काहि माणसांचे स्वभावगुण रेखाटलेले आहेत.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.