आज पासून ३० वर्ष्याननंतर म्हणजे साल २०५० मध्ये पुन्हा एकदा जगाला टाळेबंदीला सामोर जावे लागले. साल २०५० मध्ये उद्भवलेल्या निरसन विषाणूने पुन्हा एकदा जगावर महामारीचे संकट ओढवले. साल २०५० मध्ये असलेल्या नवीन पीढीला ह्या सर्व गोष्टी नवीन असल्यामुळे सर्व गोंधळून गेले होते. त्यामुळे त्यांच्या मनात साल २०२० मधल्या करोना बद्दल व इतर साथीच्या रोगांबद्दल उत्सुकता जागरूक झाली होती. म्हणून त्यांनी त्या उत्सुकते पोटी शिक्षकांना व घरच्यांना प्रश्न विचारण्यास सुरवात केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयन्त केला. तसेच मुलांनी विचारलेल्या प्रश्नामुळे घरंच्या समोर साल २०२० च्या आठवणी अगदी जश्याच्या तश्या उभ्या राहिल्या. त्यांच्या चांगल्या वाईट आठवणी त्यांच्या डोळ्या समोर अशा आल्या जश्या त्या कालच घडल्या होत्या.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.