<p>श्री. संत संताजी जगनाडे <br />यांच्या जीवनचरित्रावरील जगातील पहिलीच कादंबरी<br /><br />अजूनही संताजी त्यांचे चमत्कार वारकरी संप्रदाय व देव देवळांची भक्ती किंवा अंधश्रद्धात्मक मांडणीही मी अनेक साहित्य लेखकांच्या हस्ते साकार झालेली बघितली. आमचे संताजी महाराज हे मुळीच तसे नव्हते. हे संदर्भ साधनांच्या थोड्याशा निष्कर्षावरून सिद्ध होते. प्रयत्नवादी व विज्ञानवादी दृष्टिकोन असलेले संताजी आज मान्य करणे काळाची गरज आहे. तरच खरी संताजीची प्रेरणा आदर्श जपत आपला समाजविकास हेतू कार्य सफल करू शकतो अन्यथा नाही आणि म्हणूनच ही संताजीची कादंबरी साकार करतांना मी बहुजनवादी विचारांचा परामर्श घेत संदर्भ जुळवत अत्यंत इतिहास क्लिष्ट न करता संताजीचे छोटे-मोठे प्रसंग घटना अगदी कल्पनारम्य रंगवित ही कादंबरी साकार केलेली आहे. त्यामुळे ही वाचनीय आहे एकाच बैठकीत वाचावी व आवडेल अशीच आहे.</p>
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
*COD & Shipping Charges may apply on certain items.