जगणं नव्याने जगताना: कॅन्सरयोद्धयांचा प्रेरणादायी प्रवास

About The Book

पुस्तकाबद्दल...या पुस्तकात काही कॅन्सरयोद्ध्यांचे अनुभव शब्दांकित केले आहेत ज्यांनी कॅन्सर जवळून पाहिला जे त्याच्याशी लढले ज्यांनी त्याच्यावर मात केली आणि आज जे एक समाधानी जीवन जगत आहेत.आपले कुटुंबीय मित्र-मैत्रिणी डॉक्टर परिचारिका आपल्या उपचारादरम्यान सोबत असतात. या सर्वांची साथ आपल्यासाठी सर्वांत जास्त महत्त्वाची असतेच; तसंच या वाटेवर आपल्या सहवेदना जाणणाऱ्याने आपल्या जखमेवर घातलेली एक फुंकर आपल्याला जगण्याची नवी उमेद देते.उमेद... जी म्हणते मला लढायचं आहे कॅन्सरला हरवायचं आहे. मग सुरू होतो शोध आपल्या नवीन अस्तित्वाचा. कृतज्ञतापूर्वक स्वीकारलेलं हे नवं अस्तित्व संवेदनशील आणि अतिशय सकारात्मक असतं. जीवन आणि मृत्यूमधली पुसटशी रेषा अनुभवलेलं असतं. भूतकाळातले सगळे हिशोब संपवून क्षमाशील झालेलं असतं. भविष्याची चिंता न करता वर्तमानात आनंदाने कसं जगावं याकडे लक्ष देणारं असतं. म्हणूनच ते खूप जास्त आश्वासक असतं... इथूनच या नवीन अस्तित्वाचा सुरू होतो एक नवा प्रवास...जगणं नव्याने जगताना...लेखिका परिचय -ऐश्वर्या तानाजीराव भोसले साताराB.Sc. Agri. (Dr. PDKV Akola)M.Sc. Agri. (MPKV Rahuri)Diploma in Journalism (YCMOU)सध्या कार्यरत व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक क्षेत्रीय कार्यालय पुणे ग्रामीणशालेय जीवनापासून तिला लिखाणाची आवड आहे. विविध निबंध स्पर्धांमध्ये तिचा पारितोषिकपात्र सहभाग आहे. अलीकडच्या काळात छायाचित्रं काढण्याची आवड तिने जोपासली आहे. 'अग्रोवन' या शेतीविषयक दैनिकामध्ये ग्रामीण जीवनावरची तिची काही छायाचित्रं प्रसिद्ध झाली आहेत.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE