डॉक्टर - डॅम: डॉक्टर - अ मेडिकल डिटेक्टिव

About The Book

पुस्तक परिचय -डॉ. डॅम अर्थात डॉक्टर अ मेडिकल डिटेक्टीव्ह ही व्यक्तिरेखा अचानक सुचली. आजवर क्राईम स्टोरीज वर अनेकानेक पुस्तके वेब सिरीज टीव्ही सिरीअल्स व चित्रपट झाले परंतु मुख्य भुमिकेत डॉक्टर असलेल्या कथा तशा विरळा. खुनाच्या खटल्यात आय व्हिटनेस महत्त्वाचे असले तरी बहुतांश वेळेस ते मिळत नाहीत. पोलिस आरोपी पकडतात. आरोपी गुन्हा कबूल करतात परंतु कोर्टामध्ये गुन्हाकबुली ग्राह्य धरली जात नाही. वकील कबुलजबाब खोटा सिद्ध करत आरोपीची निर्दोष सुटका करवतो.काही केसेसमध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट परिस्थितीजन्य पुरावे सिद्ध करू शकतात. तपासण्या व पुरावे गोळा करून खुन व आरोपी यांचा संबंध भक्कमपणे सिद्ध करता येतो. पुस्तकातील बारा कथा केवळ वाचकांच्या मनोरंजनासाठी नसून मेडिकल ऑफीसर वकील व पोलिसांना पूरक ठरतील अशी अपेक्षा. सर्व कथा सत्य घटनेवर आधारित असून काही वर्तमानपत्रात इलेक्ट्रॉनीक मिडीयावर व युट्यूबवर पाहण्यात आल्या. या सर्व कथांमधून एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली. यांत कुठेही फॉरेन्सिक डॉक्टरचा उल्लेखच नव्हता. पुस्तकातील कथांतून मी ही फट भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.लेखक परिचय -डॉ कुमार ननावरे एक ख्यातनाम वैधकीय अधिकारी आहेत. सेवानिवृत्ती पत्करर्ण्यापूर्वी त्यांनी ३३ वर्षे महाराष्ट्र आरोग्यसेवेत त्वचा रोग तज्ञ म्हणून सेवा केली. मुबंईच्या ग्रांट मेडिकल कॉलेज मधून १९८३ साली एम. बी. बी. एस. केल्यानंतर लेखकांनी डॉ आर एन कपूर हॉस्पिटल अंधेरी येथील post mortem विभागात १९८६ पर्यंत तीन वर्षे काम केले. या ३ वर्षात त्यांनी जवळपास ६००० post mortem केले आणि त्याशिवाय उर्वरित ३० वर्षांत आणखी १०००० post mortem मार्गी लावले.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE