नमस्कार! माझं नाव सागर गारवे आहे. मी एक बिझनेस कोच लाईफ कोच आणि NLP कोच आहे. ABNLP USA तर्फे प्रमाणित झालो आहे व Sagar's Life Gurukul आणि Global Awards चा संचालक आहे. मी मागील बारा वर्षांपासून महाराष्ट्र आणि भारतभर कार्यरत आहे. या कालावधीत मी माझ्या सेमिनार्स आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दहा लाखांपेक्षा अधिक लोकांना शिकवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे.माझं मूळ गाव अकोला असून मागील सहा वर्षांपासून मी पुण्यात स्थायिक झालो आहे. माझ्या करियरची सुरुवात नोकरीपासून झाली. तब्बल सोळा वर्ष विविध कंपन्यांमध्ये नोकरी केल्यानंतर मी व्यवसायाच्या क्षेत्राकडे वळलो. व्यवसायाच्या संबंधात अगदी शून्य ज्ञान असताना मी या क्षेत्रात प्रवेश केला. मागील चार वर्षांपासून मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. आजपर्यंत शंभरपेक्षा अधिक लोकांना मी त्यांचा व्यवसाय ऑनलाइन कसा घेऊन जायचा आणि तो ऑनलाइन सेटअप कसा करायचा याबद्दल माहिती दिली आहे. ते सर्व लोक आपला व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहेत.महाराष्ट्रामध्ये जवळजवळ शंभरपेक्षा अधिक लखपती लोक घडवण्याचं श्रेय मला मिळालं आहे. त्यांच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांपर्यंत हे शिक्षण पोहोचवलं आहे. मी एक सर्टिफाइड कोच आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज इथून मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं आहे. माझं बेस्ट सेलर बुक 'माइंडसेट टू लाइफसेट' वाचकांमध्ये लोकप्रिय आहे.माझ्या यूट्यूब चॅनलवर दहा लाखांपेक्षा अधिक लोकांनी माझे व्हिडिओज पाहिले आहेत आणि महाराष्ट्रात मी 2000 पेक्षा अधिक सेमिनार्स आयोजित केले आहेत. तुम्ही आता जे पुस्तक वाचणार आहात हे माझं तिसरं पुस्तक आहे. यामध्ये महाराष्ट्रातील व्यावसायिकांना त्यांच्या मानसिकतेबद्दल मार्गदर्शन देण्यात आलं आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.