मनातल्या भावनांना धुमारे फुटतातआपसूकच त्या पानावर उमटतात ....आठवणी ताज्या होत जातातशब्द मात्र मुके होतात...''शब्द उरातले...' हा माझा पहिलाच काव्यसंग्रह.... मनातल्या ओथंबून आलेल्या भावनांना वाट करून दिली आणि ह्या कविता सुचत गेल्या. कविता वाचताना तुम्हालाही काही हळवे क्षण आठवले तर तेच माझे साफल्य असेल.... तुमचं प्रेम आणि लोभ चंद्रकलेप्रमाणे वृद्धिंगत व्हावा हीच अपेक्षा...धन्यवाद !!!आपली ऋणीसमता नाईक-दळवी