आज व्यवहारिक जगात अनेक अडचणींना संघर्षांना मानसिक द्वंद्वांना आयुष्याबध्दल असलेल्या चुकीच्या समीकरणांना सामोरे कसे जायचे हेच समजणे त्यांना कठिण झाले. त्याची परिणिती ही झाली की आधुनिक काळात समाज रोगग्रस्त होण्यास सुरवात झाली.यावर उपाय म्हणजे योग शास्त्र हे “योग चिकित्सा” म्हणुन वापरता येईल का असा विचार उत्पन्न झाला आणि अनेक संदर्भामुळे आणि संशोधनांमुळे हे सिध्द झाले की रोगाचे मुळ हे मानसिक आणि भावनिक त्रासामधेच आहे.आज गरज आहे ती रोगाला मुळापासून नष्ट करण्याची. आणि असा एकमेव विषय आहे जो मनाची चिकित्सा करण्यासाठी समर्थ आहे आणि तो म्हणजे “योग”. म्हणुनच योग या शारिरीक नसुन मनोकायीक हे समजणे महत्वाचे आहे. योग फक्त शरीरासाठी नसुन शरिराद्वारे मनाला आणि मनाच्या अस्थिरतेला नियंत्रण करणारा विषय आहे. योग शरीरा द्वारे भावनिक संतुलन प्राप्त करणारा विषय आहे.