अदृश्य सावट:

एक आदर्श बायको एक रहस्यमय बेपत्ता होणे आणि एका बहिणीचा थरारक शोध... पण सत्य नेहमीच सावलीसारखं पाठलाग करतं...

अनया बाहेरून सर्वांना एक सुखी आणि आदर्श स्त्री वाटणारी एके घनघोर पावसाळी रात्री अचानक बेपत्ता होते. तिच्या मागे फक्त तिची डायरी आणि एक फुटलेला आरसा शिल्लक राहतो-जणू काहीतरी भयावह घडल्याची ती शेवटची साक्ष. जग तिला पळून गेलेली किंवा आत्महत्या केलेली समजते पण तिची बहीण रिया मात्र यावर विश्वास ठेवायला तयार नाही. अनयाच्या 'आदर्श' लग्नाच्या मागे एक काळं भयाण सत्य दडलं आहे याची तिला खात्री आहे.

रिया जसजशी अनयाच्या डायरीतील पाने उलटते तसतसे तिच्यासमोर एक भयावह सत्य उलगडते-मानसिक छळ अदृश्य जखमा आणि आत्मसन्मानासाठी केलेल्या शेवटच्या संघर्षाची ती कहाणी आहे. अनयाच्या आयुष्यातील हरवलेली ओळख आणि तिच्या मनात दडलेल्या वेदना रियाला जाणवू लागतात पण त्याचबरोबर तिला एका जीवघेण्या सापळ्यात ओढले जात असल्याची जाणीव होते.

पण रिया जितकी सत्याच्या जवळ जाते तितकेच तिचे स्वतःचे आयुष्यही विस्कळीत होऊ लागते. कारण अनयाची खरी कहाणी कोणालाही समजू नये अशी इच्छा असलेला कोणीतरी आहे. तो अदृश्य सावटासारखा रियाच्या प्रत्येक पावलावर नजर ठेवून आहे.

आणि अनयानंतर रियाचाच नंबर लागू शकतो...

हा थरारक प्रवास तुम्हाला मानवी मनाच्या खोलवर घेऊन जाईल जिथे भीती रहस्य आणि अनपेक्षित सत्य दडलेले आहे. अनया रिया आणि माधवी यांच्या धाडसाची आणि न्यायासाठीच्या संघर्षाची ही कहाणी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.

'अदृश्य सावट' - जिथे सत्य सावलीसारखं पाठलाग करतं.

Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.