हे पुस्तक स्थल आणि कालाचे स्वरूप निर्मितीतला ईश्वराचा सहभाग विश्वाचा इतिहास आणि भवितव्य यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट होण्याकरिता एका अर्थाने आणखी संक्षिप्त असले तरी दुसर्या बाजूला ते मूळ लिखाणातील महान विषयांची सुधारून वाढवलेली आवृत्ती आहे. आपल्या लिखाणाचा आशय वाचकांपर्यंत पोहोचावा आणि त्याचबरोबर ते लिखाण अद्यतन वैज्ञानिक निरीक्षणे आणि शोधांच्या प्रकाशात अद्ययावत बनावे असे लेखकांना वाटते. केऑटिक बाऊंडरी कंडिशन्ससारख्या शुद्ध तांत्रिक संकल्पना आता गायब झाल्या आहेत. या उलट अधिक व्यापक आकर्षण असणार्या संकल्पना - उदाहरणार्थ सापेक्षता स्थलाची वक्रता आणि पुंजयामिकी सिद्धान्तन - ज्या पूर्वी समजायला यासाठी कठीण होत्या की त्या पुस्तकात सर्वत्र इतस्ततः पसरल्या असल्याने समजायला कठीण बनल्या होत्या त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रकरणे बहाल करण्यात आली आहेत. या पुनर्रचनेमुळे लेखकांना विशेष महत्त्वाच्या आणि अद्यतन प्रगतीच्या विषयांकडे लक्ष देणे शक्य झाले आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.