ए जर्नी टू द सेंटर ऑफ दि अर्थ ज्युल्स व्हर्न ह्यांची १८६४ सालची प्रसिद्ध विज्ञान काल्पनिका ! जर्मन प्राध्यापक हार्डविग ह्यांचा दावा असतो की ज्वालामुखीचं विवर पृथ्वीच्या पोटात अगदी मध्यभागी जातं. आपला दावा सिद्ध करण्याच्या उद्देशाने ते स्वत: त्यांचा भाचा हँंरी आणि वाटाड्या हँन्स आईसलॅडमधील एका ज्चालामुखीच्या विवरातून पृथ्वीच्या पोटात उतरतात. तिथे त्यांना अनेक नैसर्गिक आपत्ती व हतिहासपूर्वकालीन प्राण्यांशी सामना करावा लागतो. अखेर ते दुसऱ्या ज्चालामुखीतून दक्षिण इटलीतील एका पर्वतावर बाहेर येतात. त्यांच्या ह्या अद्भुत प्रवासाची ही तेवढीच चित्तथरारक कहाणी. ह्या कादंबरीवर दोन चित्रपटआणि एक दूरदर्शन मालिका प्रसारीत झाली होती.