स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शिक्षणाचा विचार करण्यासाठी नेमलेल्या सर्व शिक्षण आयोगांनी नैतिक व आध्यात्मिक शिक्षणाला अनुकूलता दर्शविली आहे. व्यक्तिच्या बौध्दिक विकासाबरोबरच; भावनिक मानसिक व आध्यात्मिक विकास झाला पाहिजे म्हणून संस्कार व संपन्न व्यक्तिमत्व घडविण्याची जबाबदारी पर्यायाने शाळां महाविद्यालयांवर येऊन ठेपली आहे. भारतातील विविध शैक्षणिक आयोगांनी मानवी मूल्यांच्या शिक्षणाची गरज सांगितली आहे. हॉवर्ड गार्डनर यांची बहुआयामी बुध्दिमत्तेची संकल्पना शिक्षणक्षेत्रात मार्गदर्शक ठरली. जसे व्यक्तीची बुद्धिमत्ता भावनिक बुध्दिमता सामाजिक बुध्दिमत्ता व्यक्तीला तिच्या जीवनात यशस्वी करण्यास सहाय्यभूत ठरते तसेच व्यक्तीची आध्यात्मिक बुध्दिमत्ता तिला मार्गदर्शक ठरते का? आध्यात्मिक बुध्दिमत्तेची संकल्पना व्यक्तीला ख-या अर्थाने माहित आहे का? व त्याचा वापर व्यक्ती दैनंदिन जीवनात कळत नकळतपणे करते का?