*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹385
₹525
27% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
डॉ. वि. ना. श्रीखंडे स्वादुपिंड आणि पित्ताशय या कठीण समजल्या जाणार्या शस्त्रक्रियांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवून शल्यविशारद या भूमिकेतून अनेक रुग्णांना जीवनदान देणारे डॉक्टर म्हणून डॉ. श्रीखंडे ओळखले जातात.वाचेतील दोष, त्यामुळे भाषांविषयी भीती, गणितातली आकडेमोड आणि डोक्यात न शिरणार्या इतिहासातल्या सनावळ्या अशा परिस्थितीत एक सर्वसामान्य भासणार्या या मुलाच्या जमेच्या बाजू होत्या, वारसा हक्काने मिळालेला स्वभावातला कनवाळूपणा, कष्ट करण्याची जिद्द आणि वेगवेगळ्या खेळांत आणि कलांमध्ये कुशल असणारे दोन हात. या गुणांच्या जोरावर स्वतःमधल्या कमतरतावर मात करून घेतलेल्या गरूड भरारीची कहाणी '.... आणि दोन हात' या आत्मचरित्रात वाचायला मिळते. हे आत्मचरित्र वैद्यक क्षेत्राच्या कक्षा ओलांडून प्रत्येक क्षेत्रात काम करणार्या वाचकाला मोलाची शिकवण देते.