स्वतःचा जीव उधळून लावत दुसऱ्याचे जीवन संपवण्याची क्रूरता दहशतवाद्यांमध्ये कशी येते ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न ह्यात केला गेला आहे. आंतरराष्ट्रीयपातळीवरील महत्त्वाच्या दहशतवादी घटना आत्मघातकी दहशतवादाची राजकीय सामाजिक धार्मिक आणि मानसिक कारणे दहशतवाद्यांचे ब्रेनवॉश स्त्रिया आणि मुलांचा केला जाणारा गैरवापर भारतापुढील दहशतवादाचे आव्हान ह्याचा अभ्यास तसेच योग्य संदर्भ ह्यांचा समावेश ह्या पुस्तकात आहे. प्रत्येक विद्यार्थी संशोधक आणि सुजाण वाचकाच्या संग्रही असावे असे हे 'आत्मघातकी दहशतवाद' ह्या विषयावरचे मराठीतील पहिले पुस्तक.