वार्षिक परीक्षा संपून उन्हाळ्याच्या सुट्टया लागल्या होत्या. यंदाच्या उन्हाळ्यात कुठे जाण्याचा योग नसल्यामुळे राधिका तिच्या आई पप्पांसोबत नागपूरातच होती. यंदाचा उन्हाळा कडक होता. इतका की जणू झाडांची पानं करपली होती. ती पाहून तिच्या मनाला खूप वेदना झाल्या. तिनं ते आईजवळ बोलून देखील दाखवलं. पण झाडांना भरपूर पाणी घाल यापलिकडे तिची आई काही बोलली नाही.