*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹835
₹900
7% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
Collection of Stories science articles Poetry and biographies from the childrens magazine Baalmitra edited by great Bha Ra Bahgwat.मराठी बालसाहित्यात भा.रा.भागवत यांचे स्थान अग्रगण्य आहे याबाबत दुमत नाही. १९३० ते ९० या साठ वर्षांच्या काळात भारांनी मुलांसाठी जे विपुल लेखन केले त्याला तोड नाही. गेली काही वर्षे ‘ङ्गास्टर ङ्गेणे’ ह्या खट्याळ पोराच्या साहसकथांनी मराठी मुलांना वेड लावले होते; पण त्याही पूर्वी -म्हणजे १९५१ ते ५७ ह्या काळात भारांनी ‘बालमित्र’ हे ‘छोट्या-मोठ्या मुलांचे छानदार मासिक’ चालविले होते. विज्ञान साहस कविता आणि चरित्रे ह्यांनी सजलेल्या ‘बालमित्रा’ने त्या काळच्या मुलांना अक्षरश: भारावून टाकले होते. अनेक प्रसिद्ध लेखक चित्रकार यांनी मनापासून बालमित्रात जीव ओतला होता. २०१० हे वर्ष भा. रा. भागवतांचे जन्मशताब्दी वर्ष आहे; त्यानिमित्ताने ‘बालमित्रा’च्या सात वर्षांच्या काळातील अंकांचे संकलित स्वरूपात पुनर्मुद्रण करण्याची ही कल्पना सर्व वयाच्या वाचकांना खिळवून ठेवील यात शंका नाही.