आज आपणा सगळ्यांचे जीवन तणावग्रस्त आहे. तांत्रिक प्रगतीचा अनावर ओघ सगळ्या व्यवसायांचे अन् व्यवहारांचे वैश्विकीकरण करण्याचा ध्यास जीवनाच्या सर्व पैलूंचे सपाटीकरण करण्याचा हव्यास आणि तथाकथित विज्ञानाच्या ठोकळ चौकटीत मानवी आयुष्याचे प्रत्येक अंग बसवण्याचा आग्रह ही या युगाची वैशिष्ट्ये. वैद्यकीय क्षेत्रालाही ती लागू आहेत. विविध प्रकारच्या तांत्रिक प्रगतीतून वैद्यकशास्त्राचा चेहरा-मोहराच पालटून गेला आहे. वैद्यकाचे बदलत गेलेले हे प्रारूप भरकटत तर चालले नाही ना? समाजात शारीरिक मानसिक आरोग्याचा प्रसार व्हावा सर्वसामान्यांचे जीवन सोपे सुखकर आनंदी व्हावे - हे वैद्यकाचे ध्येय असावे असे जर आपण मानले; तर सध्या चालू असलेला वैद्यकशास्त्राचा प्रवास योग्य दिशेने चाललेला आहे का? वैद्यकीय विवेकच भ्रष्ट होतो आहे का? वैद्यकीय व्यवसायाला ग्रासणार्या या नवनिर्मित समस्यांवर सखोल विचार करणारे वैद्यकक्षेत्रातील जागल्याचे काम करणारे एका प्रामाणिक डॉक्टराचे साक्षेपी चिंतन.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.