''आदिवासी आणि दलित चळवळ'' या ग्रंथामध्ये आदिवासींच्या विकासातील समस्या आणि समस्यांवरील उपाय आदिवासी चळवळीची उद्दिष्टे व वैशिष्टे आदिवासींच्या कल्याणासाठी शासन व स्वयंसेवी संस्थांचे प्रयत्न यांची मांडणी करण्यात आली असून आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी काही घटनात्मक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आदिवासींना अनुसुचीत जमातीचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यघटनेतील समतेवर आधारीत मुलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने सामाजीक कार्यकर्ते ठक्कर बाप्पा यांनी ''भिल्ल सेवा'' या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी कार्य केले. गोदुताई परुळेकर स्व. बाळासाहेब खेर यांनी आदिवासींच्या कल्याणासाठी मौलिक योगदान केले आहे. तसेच दलीत चळवळीच्या उदयाची कारणे यांची माहिती देण्यात येऊन समाजात जो शुद्र वर्ग होता त्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरुध्द चळवळ उभारण्याचे काम महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहु महाराज यांनी केले आहे. तसेच इतर अनेक समाजसुधारकांनी दलीतांच्या उद्धारासाठी कार्य केले आहे. तसेच दलीत चळवळीच्या कालखंडाची माहिती हि प्रस्तुत ग्रंथामध्ये दिलेली आहे. लोकशाही मुस्लीम सत्यशोधक चळवळ कामगार चळवळ मानवी हक्क धर्मनिरपेक्षता मुलभूत हक्क या संकल्पनेच्या अध्ययनातून मुलभूत संकल्पनेची ओळख होण्यास संशोधक व विद्यार्थी यांना मदत होईल.