अडीच हजार वर्षांपूर्वीचा भारतवर्ष ! एक खूप विचित्र घटना घडली त्या काळात. मगध सम्राट बिंबीसाराचा त्याच्या स्वतःच्या मुलाने खून केला. त्या मुलाचे नाव अजातशत्रू ! पण विचित्र घटना ही नव्हती. पुढे जाऊन अजातशत्रुच्या मुलानेही सिंहासन बळकावण्यासाठी आपल्या बापाचा अजातशत्रुचाही जीव घेतला. हे चालत राहिलं. अजातशत्रूचा वंश संपेपर्यंत प्रत्येक राजपूत्र आपल्या पित्याचा बळी देत सम्राट होत राहिला. प्रत्येक वंशजाला आपल्या बापाचा खून का करावासा वाटला असेल? ह्या विचित्र शापाची सुरूवात कशी झाली याची ही अद्भुत कहाणी !