*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹390
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
अलेक्झांडर दि ग्रेट, चेंगीझ खान, ज्युलियस सीझर, जनरल पॅटन, मियामोटो मुसाशी अशा जगातील गाजलेल्या अजिंक्य योद्ध्यांच्या पंक्तीत आपल्या अचाट पराक्रमाने शत्रूला नामोहरम करणारे थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव घेणे सयुक्तिक ठरेल. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात बाजीराव ४१ लहान-मोठी युद्धे लढले आणि ती सगळी जिंकले. बाजीरावांसारखा लढवय्या, शूर आणि स्वाभिमानी आदर्श पुढील पिढ्यांना खूप स्फूर्तिदायक ठरू शकतो, याचा विचार करून थोरल्या बाजीरावांचे कार्यचरित्र या पुस्तकात वर्णिले आहे. लेखकाविषयी : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, तत्त्वचिंतक व जाणकार लेखक. 'कालनिर्णय' या विविध भाषांतील जगप्रसिद्ध दिनदर्शिकेचे व कालनिर्णय ब्रॅंडचे सहसंस्थापक व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत. विविध वृत्तपत्रांतून त्यांनी स्तंभलेखन केले असून जगप्रवाह', 'कशासाठी कुठवर', 'द ग्रेट गेम १९१७', अशा विविध पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. सकाळ प्रकाशनातर्फे 'काली काला' व 'नाथ संप्रदायाचे मुकुटमणी - चैतन्यगुरू गोरक्षनाथ' ही पुस्तके प्रकाशित. त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाच्या तसेच इतर विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.