*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹350
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
This combo product is bundled in India but the publishing origin of this title may vary.Publication date of this bundle is the creation date of this bundle; the actual publication date of child items may vary.ती अगदी साधीशीच काचबंद डबी त्याने नीट निरखून पाहिली. अल्बर्टने ती डबी कशीही धरली तरी त्यातली डुगडुगती सुई मात्र पुन्हा पुन्हा उत्तर दिशेकडेच वळायची! ‘एखादी अदृश्य शक्तीच त्या सुईला असा हट्टीपणा करायला भाग पाडत असणार!’ वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी हाती आलेल्या कंपासने फिजिक्सच्या अदृश्य आणि अद्भुत नियमांचं कौतुक अल्बर्ट आइनस्टाइनच्या मनात असं पेरलं गेलं आणि या नियमांचा शोध हाच त्याच्या जन्मभराचा ध्यास बनून राहिला. प्रकाशाच्या झोतावर स्वार होऊन प्रवास करता आला तर? दोर कापलेल्या लिफ्टमधून पडताना माणसाला गुरुत्वाकर्षण जाणवेल का? अशा काहीतरी भन्नाट कल्पना त्याला सुचायच्या. वर्षानुवर्षं या कल्पना त्याच्या मनात घर करून असायच्या. याच कल्पनाचित्रांचा माग काढत काढत त्याने सृष्टीची कोडी सोडवायचा प्रयत्न केला. आपल्या कल्पना गणिती भाषेत मांडण्यासाठी खूप खूप कष्ट घेतले. हे शोध विज्ञानाच्या जगासाठी महत्त्वाचे आहेतच पण वयाच्या तिसर्या-चौथ्या वर्षापर्यंत धड बोलताही न येणारा बुजरा मुलगा; शिक्षकांना नकोसा असलेला शाळा अर्धवट सोडून देणारा बंडखोर विद्यार्थी; पेटंट ऑफिसमधला साधा कारकून इथपासून विज्ञानाच्या जगाचा सुपरहिरो बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवाससुद्धा त्याच्या शोधांइतकाच सुरस आहे!.ऍल लहानपणापासूनच खूप खोडकर होता. त्याला प्रत्येक गोष्टीचं कुतूहल वाटायचं. एकदा तो बदकांसाठी आणि कोंबड्यांसाठी केलेल्या घरामागच्या खुराड्यात असाच काहीतरी उद्योग करत बसला होता. त्याच्या बहिणीला तो सापडला तेव्हा त्याचे सगळे कपडे आणि पाय पिवळे झाले होते. ‘‘कपड्यांना काय झालं?’’ असं विचारल्यावर तो म्हणाला ‘‘बदकं किंवा कोंबड्या अंड्यांवर बसल्या तर त्यांच्यातून छोटी छोटी पिल्लं बाहेर येतात पण मी बसल्यावर मात्र अंडी फुटली! असं का झालं काय माहीत !’’ सतत कुतूहलाने घेरलेला हा मुलगा म्हणजे प्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन! एडिसन अक्षरशः अथकपणे आयुष्यभर स्वतःच्या कुतूहलाचा चिकाटीने पाठलाग करत राहिला. विजेच्या दिव्याचा क्रांतिकारक शोध तर त्याने लावलाच पण सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडतील असे इतरही अनेक शोध त्याने लावले. कठीण परिस्थितीमुळे कधीही न खचलेल्या आणि संकटाला कायम संधी मानणार्या या भन्नाट माणसाचं असामान्य चरित्र आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळणार आहे; आणि त्याचं ध्येयासाठीचं झपाटलेपण आपल्याला निश्चित स्तिमित करणार आहे !NAती अगदी साधीशीच काचबंद डबी त्याने नीट निरखून पाहिली. अल्बर्टने ती डबी कशीही धरली तरी त्यातली डुगडुगती सुई मात्र पुन्हा पुन्हा उत्तर दिशेकडेच वळायची! ‘एखादी अदृश्य शक्तीच त्या सुईला असा हट्टीपणा करायला भाग पाडत असणार!’ वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी हाती आलेल्या कंपासने फिजिक्सच्या अदृश्य आणि अद्भुत नियमांचं कौतुक अल्बर्ट आइनस्टाइनच्या मनात असं पेरलं गेलं आणि या नियमांचा शोध हाच त्याच्या जन्मभराचा ध्यास बनून राहिला. प्रकाशाच्या झोतावर स्वार होऊन प्रवास करता आला तर? दोर कापलेल्या लिफ्टमधून पडताना माणसाला गुरुत्वाकर्षण जाणवेल का? अशा काहीतरी भन्नाट कल्पना त्याला सुचायच्या. वर्षानुवर्षं या कल्पना त्याच्या मनात घर करून असायच्या. याच कल्पनाचित्रांचा माग काढत काढत त्याने सृष्टीची कोडी सोडवायचा प्रयत्न केला. आपल्या कल्पना गणिती भाषेत मांडण्यासाठी खूप खूप कष्ट घेतले. हे शोध विज्ञानाच्या जगासाठी महत्त्वाचे आहेतच पण वयाच्या तिसर्या-चौथ्या वर्षापर्यंत धड बोलताही न येणारा बुजरा मुलगा; शिक्षकांना नकोसा असलेला शाळा अर्धवट सोडून देणारा बंडखोर विद्यार्थी; पेटंट ऑफिसमधला साधा कारकून इथपासून विज्ञानाच्या जगाचा सुपरहिरो बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवाससुद्धा त्याच्या शोधांइतकाच सुरस आहे!.ऍल लहानपणापासूनच खूप खोडकर होता. त्याला प्रत्येक गोष्टीचं कुतूहल वाटायचं. एकदा तो बदकांसाठी आणि कोंबड्यांसाठी केलेल्या घरामागच्या खुराड्यात असाच काहीतरी उद्योग करत बसला होता. त्याच्या बहिणीला तो सापडला तेव्हा त्याचे सगळे कपडे आणि पाय पिवळे झाले होते. ‘‘कपड्यांना काय झालं?’’ असं विचारल्यावर तो म्हणाला ‘‘बदकं किंवा कोंबड्या अंड्यांवर बसल्या तर त्यांच्यातून छोटी छोटी पिल्लं बाहेर येतात पण मी बसल्यावर मात्र अंडी फुटली! असं का झालं काय माहीत !’’ सतत कुतूहलाने घेरलेला हा मुलगा म्हणजे प्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन! एडिसन अक्षरशः अथकपणे आयुष्यभर स्वतःच्या कुतूहलाचा चिकाटीने पाठलाग करत राहिला. विजेच्या दिव्याचा क्रांतिकारक शोध तर त्याने लावलाच पण सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडतील असे इतरही अनेक शोध त्याने लावले. कठीण परिस्थितीमुळे कधीही न खचलेल्या आणि संकटाला कायम संधी मानणार्या या भन्नाट माणसाचं असामान्य चरित्र आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळणार आहे; आणि त्याचं ध्येयासाठीचं झपाटलेपण आपल्याला निश्चित स्तिमित करणार आहे !