*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹170
₹200
15% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
या ईशमार्गाला परमार्गाला आदी कारण असलेले भगवान श्री दत्त महाराजांना दंडवत प्रणाम !!! ज्यांनी मला हा पर मार्ग दाखवला असे माझे पहिले अध्यात्मिक गुरु आदरणीय श्रद्धेय परम पूज्य परम महंत श्री प्रमोद मुनी लाड ( बेलापूर) तसेच ज्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने या अमृतस्य पुत्रम् पुस्तकाची मी रचना करू शकलो असे माझे दुसरे अध्यात्मिक गुरु आदरणीय श्रद्धेय परम पूज्य परम महंत श्री ईश्वरदास महानुभाव ( नांदेड) महानुभाव प्रतिती पंथ या You tube चॅनेल चे संस्थापक व संचालक यांना साष्टांग नमस्कार!! अमृतस्य पुत्रम् म्हणजे नक्की काय??? ‘अ’म्हणजे नाही मृत म्हणजे जे नष्ट पावते ज्याचा विनाश अटळ आहे असा . अमृतस्य म्हणजे ज्याला मरण नाही मृत्यू नाही असो तो परमेश्वर. पुत्र म्हणजे अपत्य. अमृतस्य म्हणजे जो परमेश्वर निर्गुण निराकार परब्रम्ह अशा परमेश्वरांची आपण सर्व लेकरे(अपत्य) आहोत म्हणजे आपला (जीवात्मा) जन्म हा अविनाशी अशा परमेश्वरापासून झालेला आहे आणि या गोष्टीचा नकळत सर्व लोकांना विसर पडत चालला आहे. हे सर्वांना स्मरणीय व्हावे या करीता हा छोटासा प्रयत्न मी केला आहे. हे पुस्तक नक्कीच सर्वांना अध्यात्मिक प्रगती कडे नेण्यास दिशादर्शक ठरेल अशी अपेक्षा ठेवतो . दंडवत प्रणाम!!!