विविध प्रकारची अन्नधान्ये फळे भाज्या वापरून टिकाऊ खाद्यपदार्थ बनवणे हे अन्नप्रक्रिया उद्योगाचे खरे स्वरूप! यांपैकी फळ-भाजीपाला प्रक्रिया उद्योगाचे तंत्रज्ञान व या उद्योगासाठी लागणारी माहिती उपलब्ध व्हावी या हेतूने अन्नप्रक्रिया उद्योग या पुस्तकाची निर्मिती लेखिका व्यावसायिक तज्ज्ञ डॉ. ललिता बोरा यांनी केली आहे. भारतीय अन्नसुरक्षा मंत्रालयाच्या (FSSAI) नियमानुसार जीएमपी आणि जीएचपी तसेच एचएसीसीपीचे उदाहरणांसह विश्लेषण उद्योगाच्या उभारणीपूर्वी उद्योजकांना तयार कराव्या लागणाऱ्या प्रकल्प-अहवालाचा नमुना उपयुक्त वेबसाईट कार्यालयांची यादी आवश्यक कागदपत्रांविषयीचा तपशील तसेच उद्योजकाच्या गुणवत्तेविषयीचे विश्लेषण यामध्ये आहे. सूक्ष्म लघु व मध्यम व्यावसायिक स्टार्टअप उद्योजक शेतीपूरक व्यावसायिक विद्यार्थी ते गृहिणी या सर्वांना प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शक ठरणारे थोडक्यात अन्नप्रकिया उद्योजक बनण्याचे प्रशिक्षण देणारे संदर्भ पुस्तक! लेखिकेविषयी माहिती : डॉ. ललिता विजय बोरा यांनी बी.ए. (अर्थशास्त्र) फूड अँड न्यूट्रिशियन कोर्स मानव संसाधन मंत्रालय भारत सरकार सी.एफ.टी.आर.आय. म्हैसूर येथून अन्नतंत्रज्ञ हे शिक्षण घेतले आहे. डॉक्टरेट इन फूड सायन्स डॉक्टरेट इन कम्युनिटी फिटनेस अँड हेल्थ या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत. टोबॅको रिप्लेसमेंट टूल हे तंबाखूमुक्त अभियान २०१७पासून त्यांनी सुरू केले आहे. अल्कोहोल रिप्लेसमेंट ज्यूसेस तसेच फळे भाज्या आणि औषधी वनस्पती यांची नैसर्गिक तयार उत्पादने हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.