आत्महत्येचा प्रयत्न हे पुस्तक मानवीय संवेदना आणी त्यातुननिर्माण होनारे प्रश्न उपस्थित करते. या पुस्तकाची कथा विकी नावाच्या एका तरून मुला भोवती फिरते मी कोन आहे ? मला काय करायच आहे ? माझ समाधान कशात आहे ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या कथेत केला आहे. खर तर हे पुस्तक स्व चा शोध घेनार आहे यात समाजशास्त्रमानसशास्र आणी माणूस यांचा सह संबंध दाखवलेला आहे. या कथेचा मुख्य हेतु येवढाच की माणसाने शाश्वत समाधान शोधाव व आपला जन्म सफल बनवावा.