*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹200
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
वैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले हे व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून गेली ४८ वर्षं आरोग्य सेवेसाठी व्रतस्थपणे झटत आहेत. आयुर्वेदामधल्या संशोधनाबरोबरच ‘आयुर्वेद’ लोकप्रिय व्हावा या दुहेरी उद्देशाने त्यांनी १९७४ साली ‘वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन’ संस्थेची स्थापना केली. तसेच त्यांनी ‘हरी परशुराम औषधालय’ आणि ‘आयुर्वेदिक औषध भांडार’ सुरू केलं असून २०० प्रकारच्या आयुर्वेदिक पद्धती आणि आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारी १५०हून अधिक ग्रंथसंपदा वैद्य खडीवाले यांच्या नावावर आहे. १९८२ साली ‘जनकल्याण रक्तपेढी’ आणि १९८८ साली ‘जनकल्याण नेत्रपेढी’ सुरू करून त्याद्वारे त्यांनी हजारो गरजूंना मदत केली. तसेच बीड जिल्ह्यामध्ये मोफत आयुर्वेद चिकित्सालयाद्वारे ५ वर्षं आरोग्यसेवा राबवली. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने त्यांची ‘राष्ट्रीय गुरू’ म्हणून निवड केली आहे. पुरस्कार : • २००९ साली मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या तर्फे दिल्ली येथे ‘शताब्दी महर्षी’ म्हणून गौरव. • २०१५ साली मा. श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्व आयुर्वेद महाविद्यालयातर्फे ‘आयुर्वेद भूषण’ पुरस्कार प्रदान. • २०१६ साली दिल्ली येथे मा. आयुष आरोग्य मंत्री श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते पहिला ‘राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार’ प्रदान.