*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹157
₹200
21% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
प्रस्तुत पुस्तक इंग्रजीतल्या The Temple Cyclopaedic Primers नावाच्या पुस्तकमालेपैकी The Child His nature and nurture या पुस्तकाचे रूपांतर आहे. रूपांतर म्हणण्याचे कारण हे की या पुस्तकाचा बहुतांश मुलाची शारीरिक वाढ व मानसिक विकास कसा होत असतो व त्या वाढीच्या व विकासाच्या नियमास अनुसरून मुलाचे संगोपन व संवर्धन कसे केले पाहिजे याबद्दलच्या शास्त्रीय सोपपत्तिक विचाराने व्यापिला आहे; व ते नियम जितके पाश्चात्त्यांना तितकेच भारतीयांनाही लागू असल्यामुळे या विवेचनापुरत्या भागात काही ढवळाढवळ न करता इंग्रजी भाषेत व्यक्त केलेले विचार मराठीत अनुवादरुपाने देण्यापलीकडे मला काही एक करावे लागले नाही. पण या विवेचनात काही जागी ( उदाहरणार्थ प्रकरण ३ व ४ यात) मूळ इंग्रजी ग्रंथकर्त्याने पाश्चात्त्य रीतरिवाजास अनुसरून बालसंगोपनासंबंधाने काही व्यावहारिक सूचना केल्या आहेत. हा भाग आपल्या चालीरीतींच्या भिन्नत्वामुळे मूळातल्याप्रमाणे जसाचा तसा देण्यात काही अर्थ नव्हता म्हणून मूळ इंग्रजी लेखकाचा उद्देश व धोरण कायम ठेवून तदनुसार आपल्या गृहस्थितीला साजतीलशा सूचना करणे अवश्य होते. अशा ठिकाणी मूळ पुस्तकाला बाजूला ठेवून पण त्याच्या पद्धतीने बालसंगोपनाविषयी स्वतंत्र प्रकरणे लिहावी लागली. अशा रीतीने या पुस्तकाला धड भाषांतराचे स्वरूप नाही व धड स्वतंत्र रचनेचेही स्वरूप नाही तर एक तऱ्हेचे संयोगात्मक मिश्र स्वरूप आले आहे; आणि माझी समजूत अशी आहे की आम्हाला पाश्चात्त्य शास्त्रज्ञ तत्त्वज्ञ शोधक शिक्षक कलाभिज्ञ वगैरेंच्या कृतीपासून खरोखर फायदा करून घ्यावयाचा असेल तर तो त्यांच्या ग्रंथातल्या अक्षरश: केलेल्या भाषांतरापासून न होता त्यांचे विचार पचवून व आपल्या रक्तात भिनवून आपल्या समाजास अनुरूप अशा सुधारणांच्या सूचनांच्या रूपाने मराठी लेखकांनी समाजाला करून दिला पाहिजे.