जातककथा म्हणजे भगवान बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या कथा. अशा या ५४६ कथा आहेत. बुद्धाने प्रत्येक जन्मात एकेक गुण मिळवत शेवटी बुद्धपद गाठले. बौद्धधर्मियांच्या धार्मिक वाङ्मयात जातककथांना महत्त्वाचे स्थान आहे. कुमारमित्रांना या जातककथांची ओळख व्हावी म्हणून या पुस्तकात सोप्या भाषेत दुर्गा भागवत ह्यांना ५४६ कथांपैकी ५३ निवडक जातककथा दिल्या आहेत. जातककथा या नितीकथाही आहेत. प्राचीन वाङ्मयात जातककथांना महत्त्वाचे स्थान आहे.या जातककथांच्या वाचनाने कुमारवाचकांनारंजनाबरोबरच प्राचीन भारतीय संस्कृतीची ओळखही होईल या कथांत प्राणीकथाही आहेत. तसेच राजा राणीही आहेत. कुमारांच्या कल्पनासृष्टीला चालना देणाऱ्या या कथा आहेत. या कथांच्या वाचनाने जातककथा मुळातून वाचावी अशी प्रेरणा होईल.जातककथांची गोडी अवीट आहे. त्या जातककथांची ओळख बाल व कुमार वाचकांना व्हावी हाच या पुस्तकाचा उद्देश आहे.