भगवद्गीतेत असे काही श्लोक आहेत की त्यांचे विज्ञानाशी निगडीत मूलभूत तत्त्वांशी (Science शी) विलक्षण साम्य आढळून येते. विश्वाची उत्पत्ती आणि त्यातून झालेली सजीव सृष्टीची निर्मिती याचेशी निगडीत विज्ञानाच्या विविध शाखा उदा. खगोलीय भौतिक शास्त्र (AstroPhysics) सजीव सृष्टीच्या निर्मितीशी संबंधित जीवनशास्त्र (biology) व इतर विषय भौतिकशास्त्र (Physics) रसायनशास्त्र (Chemistry) सूक्ष्मकणांचे भौतिक शास्त्र (Particle Physic) इ. यातील मूलभूत तत्त्वांचा कुठे ना कुठे संदर्भ भगवद्गीतेतील श्लोकात ओघाओघाने कसा येतो याचे सदर श्लोकात अर्थासह संदर्भ देऊन विवेचन सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.