भारत धर्म आणि अध्यात्माप्रमाणेच गणित आणि विज्ञानात देखील प्रथमस्थानी राहिलेला आहे आणि आज पुन्हा संपूर्ण जगाच्या पटलावर आपली स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण करू लागला आहे. आईटी अर्थात माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात तर त्याला काही तोडच नाही आणि आज या क्षेत्रात भारत जणू जगातील एक महाशक्तीच बनला आहे.<br>प्राचीन काळात भारताचे चरक सुश्रुत जीवक सारखे चिकित्सक आणि नागार्जून सारखे अदभूत जादूगार जगप्रसिद्ध होते आणि आर्यभट्ट वराहमिहिर ब्रह्मगुप्त आणि भास्कराचार्य सारख्या शास्त्रज्ञाने विज्ञानासोबत गणिताला घेऊन जो आश्चर्यकारक शोध लावला तो चकित करणारा आहे. या दृष्टीने भारताच्या या महान योगदानाला आज सगळे मान्यच करतात. याप्रमाणे शून्याचा शोध भारताचा असा शोध आहे ज्याने विज्ञान आणि गणिताच्या अनेक शोधांचे दरवाजे उघडले. या पुस्तकात प्रसिद्ध साहित्यकार आणि विज्ञान - चिंतक प्रकाश मनुने भारताच्या अशाच युग प्रवर्तक शास्त्रज्ञांच्या जीवन आणि त्यांच्या महान योगदानाच्या संदर्भात माहिती दिली आहे. जे वाचून बालक आणि किशोर वाचकांना आपल्या देशाच्या महान वैज्ञानिक परंपरेच्या संदर्भात माहिती मिळेल. सोबत हे वाचल्यावर काही नवे करण्याची इच्छा आणि एक नवीन उत्साह निर्माण होईल.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
*COD & Shipping Charges may apply on certain items.