Bharat : Sankalpana Vichar Ani Magova

About The Book

भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (New Education Policy) राबविण्यास सुरुवात केली आहे. कौशल्य शिक्षण (Skill Enhancement) हा या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानुसार महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी आयडिया ऑफ इंडिया (Idea of India) हा विषय सुरू करण्यात आला आहे. तथापि लेखकाने केलेली सध्याच्या राजकारणावरील मांडणी राजकीय विषयाच्या सर्वच वाचकांना अभ्यासण्यासारखी आहे. भारत : संकल्पना विचार आणि मागोवा हे पुस्तक संदर्भ पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाची ठरणारी सॉफ्ट स्किल्स देण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी विचारवंतांचे आधुनिक भारत संकल्पनेबद्दलचे विचार सामाजिक सलोखा सारख्या संकल्पना या पुस्तकात चिकित्सकपणे मांडल्या आहेत. प्रस्तुत पुस्तकात आधुनिक काळातील भारत संकल्पना विचार आणि मागोवा घेतला आहे. या पुस्तकात भारत संकल्पनेचा १८१८ पासूनचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. तसेच काश्मिरीयत बिहारियत पंजाबियत या संकल्पनांची संक्षिप्तपणे माहिती या पुस्तकात मिळते. या पुस्तकामुळे संकल्पनाविषयक माहिती मिळते; त्याचबरोबर भारतीय नागरिक म्हणून या विविध संकल्पनांच्या चौकटीत कायदा शांतता आणि सुव्यवस्था कशी निर्माण केली जाते या संदर्भातील माहितीदेखील मिळते. लेखकाविषयी माहिती : लेखक प्रा. डॉ. प्रकाश पवार हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी राज्यशास्त्र विषयाचे विभागप्रमुख म्हणून २०१६ ते २०१८ या काळात काम पहिले आहे.. आधुनिक भारतीय राजकीय विचार आणि राजकीय प्रक्रिया महाराष्ट्रातील राजकारण हे त्यांचे प्रमुख अभ्यासविषय आहेत.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE