भारतीय क्रांतीकारकांचे कार्य काही माथेफिरू तरूणांचे स्वतंत्र अनियोजित व अयशस्वी प्रयत्न नव्हते. भारतमातेच्या शृखंला तोडण्याकरिता सतत झटणाऱ्या देशभक्तांची एक अखंड परंपरा होती. देशाच्या रक्षणासाठी शस्त्र घेणे नागरिक कर्तव्य आहे. क्रांतीकारकांचे उद्दिष्ट इंग्रजांचे रक्त सांडणे नव्हते. तर क्रांतीकारी आपल्या देशाचा सन्मान पुन्हा प्रतिष्ठित करू पहात होते. अनेक क्रांतीकारकांच्या हृदयात एकीकडे क्रांतीची ज्वाला पेटत होती तर दुसरीकडे अध्यात्माची ओढही होती. हसतमुखाने फासीच्या फंद्याचे चुंबन घेणारे आणि मायभूमिसाठी 'सरफरोशी तमन्ना' बाळगणारे हे देशभक्त युवक भावुकच नव्हते दूरदर्शी विचारवंतही होते. त्यांचे स्वप्नं होते शोषणरहित समाजवादी प्रजातंत्र हे स्वातंत्र्य जर सशस्त्र क्रांतीच्या आधारे मिळाले असते तर बहुधा भारताची फाळणी झाली नसती. अशा परिस्थितीत सत्ता त्या हातांमध्ये आली नसती की ज्यामुळे आज भारतात अनेक भीषण समस्या उभ्या आहेत.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
*COD & Shipping Charges may apply on certain items.