देशभक्तीचा सर्वात उत्कट आविष्कार म्हणजे प्रत्यक्ष सीमारेषेवर शत्रुशी दोन हात करण्याची संधी! ही संधी मिळते लष्करात! लष्करात भरती होणे आणि देशासाठी स्वतःच्या प्राणांची समिधा अर्पण करणे ह्यापेक्षा मोठा कोणताही त्याग नाही. युद्धात शत्रुशी लढतांना धारातीर्थी पडणाऱ्या जवानांच्या कहाण्या ह्या शौर्याने आणि बलिदानाने ओतप्रोत भरलेल्या असतात. त्या वाचण्याचा मोह झाल्याशिवाय रहात नाही. भारताच्या लष्करी इतिहासातही अत्युच्च त्याग करणाऱ्या सैनिकांचा समावेश आहे. त्यांच्याविषयीची माहिती सर्वत्र पोहचावी हा ह्या पुस्तकामागचा हेतू आहे. संक्षिप्त स्वरुपात ह्या लष्करातील वीरांची त्यांच्या त्यागाची माहिती पुस्तकरूपात सादर करतांना आनंद होत आहे. विशेषत: ज्या वीरांना परमवीरचक्राने सन्मानित केले गेले त्यांच्या युद्धकथा ह्यात समाविष्ट आहेत.