भाऊसाहेब ऊर्फ सदाशिवरावभाऊ पेशवा यांच्या सन १७५३ ते १७६१ म्हणजे पानिपतावरील वीरमरण या काळातील कारकीर्द या पुस्तकात सविस्तरपणे नमूद केलेली आहे. या बखरीचे संपादन शं. ना. जोशी यांनी केलेले आहे. या बखरीची सुरवात होळकरांनी कुंभेरी किल्यास घातलेल्या वेढ्याने होते व बखरीचा शेवट पानिपत युद्धानंतर नानासाहेब पेशवा यांच्या मृत्यूने होतो.