*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹161
₹170
5% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
भावबंध हे आहे सत्यकथन. भावनांचं भावचित्र. घटनांमागचे भाव जाणून तरुण पिढी भावसमृद्ध व्हावी ही यामागे भावना आहे. यातून जाणवू शकेल समायोजनातील समाधान समर्पणातलं सुख प्रेमातलं पारदर्शित्व संसारातली सहजसुंदरता व्यक्तिगत अनुभवांतून साकारणारं व्यक्तिनिरपेक्ष मार्गदर्शन अन् साध्याविषयातही मोठा आशय सापडल्याचा आनंद! घराबाहेर कर्तृत्व दाखवणाऱ्या मंडळींच्या आठवणी लिहिण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. पण सारं घर उभं करणाऱ्या गृहिणीच्या इतक्या नितळ पारदर्शी आठवणी लिहिणारी मंडळीच विरळा. मोहन सरडे सर आणि त्यांचा ‘भावबंध’ त्यांपैकी एक. हा भावबंध आपल्याला त्यांच्या आठवणींशी बांधून टाकतो. - सौ. धनश्री लेले ठाणे (मुंबई) लेखकाविषयी : मोहन कृष्णराव सरडे हे निवृत्त प्राध्यापक व विलिंगडन महाविद्यालयसांगली येथे उपप्राचार्य आहेत. ते विविध शाळा आणि महाविद्यालयातून प्रासंगिक व्याख्याने देतात. आकाशवाणी सांगली केंद्रातून ‘मनाचा शोध’ व ‘चिंतन’ या सदरात सुमारे ५० विषयांवर त्यांची व्याख्याने प्रसारित झाली आहेत. मी असा बोललो शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप कराड रत्ने आणि मोती संतदर्शन हे त्यांचे प्रकाशित साहित्य आहे.