*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹239
₹260
8% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
१९६२ साली तत्कालीन मंत्रिमंडळात अन्न व कृषी खात्याचे राज्यमंत्री म्हणून डॉ. अण्णासाहेब शिंदे यांची निवड झाली. त्यापुढची १५ वर्षे म्हणजे १९७७ पर्यंत अण्णासाहेब शिंदे या पदावर कार्यरत होते. अन्न आणि कृषीक्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करू इच्छिणाऱ्या भारतासाठी हा काळ कठीण होता. अशा काळात या पदावर राहून डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याचा आणि त्यांच्या एकूणच कारकीर्दीचा आढावा या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या काळात विविध पदांवर राहून त्यांच्याबरोबर काम केलेल्या त्यांचा सहवास लाभलेल्या मान्यवरांनी त्यांच्याविषयी म्हणून मांडलेले विचार या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत. यामध्ये हरितक्रांतीचे जनक मानले गेलेल्या डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्यासह अनेक मान्यवरांचे कृषी तज्ज्ञांचे आणि शास्त्रज्ञांचे डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या उत्तुंग कार्याबद्दलचे लेख आहेत. या लेखांमधून अण्णासाहेबांच्या योगदानाचा तपशीलवार आढावा तर आहेच पण त्याचबरोबर या लोकांशी असलेले त्यांचे व्यक्तिगत नातेही प्रकाशात आले आहे. हे पुस्तक ‘Hungry Nation to Agro Power’या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. लेखकाविषयी: अनिल शिंदे हे डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे सुपुत्र. हे पुस्तक म्हणजे अनिल शिंदे यांनी अण्णासाहेब शिंदे यांच्यावरील लेखांचे संकलन आहे.