२३ जून १७५७'... ह्याच दिवशी... प्लासीच्या रणसंग्रामाला शंभरवर्षे पूर्ण होत आलेली होती. आणि ह्याच मुहुर्ताचं औचित्य साधून '१८५७'च्या २३ जून पूर्वी काही महिने. तत्कालिन अर्थात पूर्ण हिंदुस्थानाचे संस्थानिक राजे यांनी इंग्रजसत्तेविरोधात 'न भूतो न भविष्यती' अशी अगदी अंतर्मनातून एकदिली घडवून आणली. आणि त्या एकाच दिवशी अखंड हिंदुस्थानात 'इंग्रजी सत्तेवर' बंडाची ठिणगी पाडून वणवा पेटवण्यासाठी इंग्रजी फौजेच्या हिंदुराष्ट्रप्रेमी सैनिकांनी अगदी इंग्रजांच्या हाताखालचे त्यांना 'पाणी' देणारे पखालदार किंवा 'पाणके' लोकही हा बंडाचा वणवा उफाळण्याच्या दिवशीच त्यांना सोडून त्यांची हद्द ओलांडून बंडवाल्या हिंदुस्थानी जनतेला येऊन मिळाले ते कायमचेच. त्यापूर्वी इंग्रजी राज्यकर्त्यांसाठी.. 'सैनिकांपासून- पाणक्यांपर्यंत' त्यांच्या राहत्या घरात... 'भिक्षा मागण्यासाठी' भक्त कबिर यांचे दोहे गाता गाता जाऊन भिक्षा घेतानाच 'बंडाची तयारी करा'... 'बंडाला तयार रहा'... असे तोंडी निरोप देणाऱ्या फकिरी लोकांच्या टोळ्याच बंडवाल्या मंडळींनी तयार करून इंग्रज फौजेतल्या हिंदूसैनिकाच्या वसाहतीत पाठविल्या होत्या. ही तयारी ३१ मे १८५७ पासूनच सुरू केली होती ती ब्रह्मावर्ताच्या एका महाफकिराने म्हणजेच 'दुसरे नानासाहेब अथवा धोंडोपंत पेशवे' यांनी जे दुसऱ्या बाजीराव पेशवे यांचेकडे 'दत्तक' म्हणून गेले होते. नव्या पिढीच्या प्रत्येक मराठी वाचकाला राष्ट्रप्रेमाच्या वृद्धीसाठी हे छोटेखानी कादंबरीकारूपातले पुस्तक नयनतारा देसाईंनी लिहिले आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.