भारताच्या प्रगतीची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे? इंग्लंडला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकावर जाऊन पोचली आहे याचा अर्थ भारताची प्रगती होत आहे असा होतो का? का लक्षावधी बेरोजगारांना रोजगार पुरवण्यास आलेल्या अपयशामुळे अर्थव्यवस्थेची पीछेहाट होत आहे? उज्वल भवितव्यासाठी आपण काय केलं पाहिजे?भारत आज एका चौरस्त्यावर येऊन पोचला आहे. भारताच्या आर्थिक वाढीचा दर कित्येक मोठ्या देशांच्या तुलनेत जास्त असला तरी आपल्या बेरोजगार तरूणांना नोकऱ्या देण्यासाठी तो खूपच कमी आहे. कमी कौशल्याच्या वस्तूनिर्माण क्षेत्रातील तीव्र स्पर्धा आपल्याच देशात वस्तूनिर्मिती करण्याकडे संरक्षणवादाकडे झुकत चाललेला जागतिक कल आणि वाढते स्वयंचलितीकरण यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झालेली आहे. समाजात फूट पाडणाऱ्या बहुसंख्यांकांच्या तुष्टीकरणातून काहीच साधले जाणार नाही. आजवर आर्थिक विकासाची वाटचाल कृषी क्षेत्राकडून कमी कौशल्याचे वस्तूनिर्माण त्यानंतर उच्चकौशल्याधारित वस्तूनिर्माण आणि सेवा क्षेत्र अशी होत आलेली आहे. विकासाच्या राजमार्गावरील मधल्या पायरीवरून उडी मारून आपण केल्हाच पुढे आलो आहोत. असं असताना परत मधली पायरी गाठण्यासाठी उलट फिरण्याऐवजी आपण आपला स्वतःचा भारतीय मार्ग शोधून काढला पाहिजे. मानवी भांडवलात गुंतवणूक करून सेवा आणि वस्तूनिर्माण क्षेत्रातील उच्च कौशल्याधारित संधींचा विस्तार करून नवी उत्पादने आणि नव्या कल्पनांना पोषक वातावरणात आर्थिक विकासाचा वेग कसा वाढवता येईल ते या पुस्तकात लेखकद्वयांनी समजावून सांगितलं आहे. भारताच्या लोकशाही परंपरांनां लोकशाही संस्थांचे सबलीकरण आणि विकेंद्रीकरणाचा विस्तार यासारख्या सुशासनातील सुधारणांची जोड मिळाल्यास विकासाच्या मार्गावरील वाटचाल सोपी होईल. ज्या ठिकाणी भारताला यश मिळाले आहे त्याचे लेखकद्वयाने खुल्या मनाने कौतूक केलं आहे तसेच त्यांनी त्यातील दोषही परखडपणे दाखवले आहेत. त्यांनी भूतकाळाला जखढून ठेवणाऱ्या शृंखला तोडून येणाऱ्या भावी काळातील शक्यतांकडे खुल्या दिलाने पाहण्याचे आवाहन केलं आहे. जागोजागी दिलेल्या समर्पक उदाहरणांनी आणि बिनतोड युक्तिवादांनी शेवटच्या पानापर्यंत वाचनीय झालेले भारताच्या भविष्याविषयी आस्था असलेल्या सर्वांनी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.