व्यवसायाची व्यूहरचना तयार केल्यामुळे तुमच्या मनात आपल्या प्राधान्यांविषयीची संपूर्ण स्पष्टता निर्माण होते. तुमच्या संसाधनांचे संघटन करता येते आणि आधीच्या तुलनेत अधिक चांगली फलिते मिळवता येतात. ही गोष्ट गुंतागुंतीची वाटू शकते; परंतु लेखकांना ती कशी सोपी करायची ते माहीत आहे. या पुस्तकातून त्यांनी व्यूहरचनात्मक नियोजनाविषयीचे अत्यंत महत्त्वाचे धडे दिले आहेत अलेक्झांडरपासून आयबीएमपर्यंतच्या आणि जनरल इलेक्ट्रिकपर्यंतच्या उदाहरणांचा वापर करून लेखक कमाल संधी मिळवण्याच्या आणि आरओआय वाढवण्याच्या उत्कृष्ट कल्पना मांडतात. कुठेही सहजपणे नेता येण्याजोगे हे प्रभावी पुस्तक तुमच्या कंपनीच्या नियतीवर दृढ नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्हाला मदत करेल.