‘चक्रवात’ हा कथासंग्रह खेड्यातल्या जनतेच्या समोरचे प्रश्न मांडतो. खेड्यातील माणसांच्या व्यथा संघर्ष नैसर्गिक आव्हानांना तोंड देताना त्यांची होणारी तारांबळ या कथांमधून आपल्यासमोर येते. या कथासंग्रहात एकूण दहा कथा आहेत. प्रत्येक कथेतील पात्र आपला जीवनसंघर्ष नेटाने लढत आहे. स्वातंत्र्यमिळूनपंचाहत्तरवर्षंउलटली तरीसामान्यमाणसांच्याभोगवट्यांतीलदु:खआजहीसंपलेलीनाहीत. शोषणाच्याकात्रीतत्यांचंकर्तनसुरूआहे याचा प्रत्यय पुस्तकातील प्रत्येक कथेतून येत राहातो. जनसामान्यांच्या जीवनातील प्रखर वास्तव मांडणारा हा कथासंग्रह वाचकांना अंतर्मुख करतो.