चारा लागवडीसाठी कमी आकाराची / उंचसखल / तुकड्यातुकड्यांची जागाही वापरता येते. त्यामुळे पडीक जमीनही उपयोगात आणून अधिक आर्थिक फायदा मिळवता येतो. अशा विविध अंगांनी फायदेशीर ठरणाऱ्या चारा उद्योगासाठी उपयुक्त आणि संग्राह्य पुस्तक * ४० गवत प्रकारांचा सविस्तर परिचय * लागणारी जमीन हवामान लागवड पीकवाढीचा कालावधी कापणी साठवण प्रत्येक गवतातील विविध पौष्टिक गुण अशी सर्वांगीण शास्त्रीय माहिती * मिश्र पिके म्हणून कोणती गवते लावावीत या संदर्भात मार्गदर्शन * मातीविना केवळ पाण्यावर (हायड्रोपोनिक तंत्राद्वारे) वाढणाऱ्या अंकुरित गवत-चाऱ्याची माहिती <br><p> <b>लेखकाविषयी : </b> कृष्णाजी महादेव कोकाटे बी.एस्सी. (कृषी) कृषी महाविद्यालय पुणे; रुरल एक्सटेन्शन ट्रेनर्स कोर्स फिलिपाईन्स; डेअरी एक्स्टेन्शन कोर्स डिपार्टमेंट ऑफ प्रायमरी इंडस्ट्रीज क्विन्सलँड ऑस्ट्रेलिया बाएफ (Bharatiya Agro Industries Foundation) डेव्हलपमेंट रिसर्च फौंडेशन उरुळी कांचन पुणे या संस्थेत १९७० पासून कार्यरत. २००५मध्ये अतिरिक्त कार्यक्रम संचालक म्हणून सेवानिवृत्त. कृषी सल्लागार बाएफ (२००५ ते २०२०) तांत्रिक अधिकारी विभागीय संशोधन केंद्र बाएफ अखिल भारतीय चारा संशोधन केंद्र नवी दिल्ली (२००५ ते २०२०) खडक जमीन विकास जल सिंचन विकास फळबागा विकास वन आणि कृषिवनशेती विकास चारा व चारा बियाणे : विकास आणि उत्पादन तुती लागवड : विकास आणि संशोधन रेशीम किडे संशोधन व विकास वन आणि फळबाग विकास पडीक जमीन विकास नगदी पिके बीजोत्पादन शेतकऱ्यांना कृषिविषयक प्रशिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये काम प्रकाशित पुस्तके : अधिक दुधासाठी हिरवा चारा; झाडेझुडपे लावा पशुधन जगवा ; चाऱ्याची गवते लावा दुधाळ पशू जगवा