गो. ना. दातार यांनी या चतुर माधवरावांच्या तेरा कथा राजापूरला रहायला गेल्यावर १९३० साली लिहिल्या. कॉनन डॉयलच्या कथेत शेरलॉक होम्स हा गुप्तहेर व वॉटसन हा त्याचा मदतनीस असायचा. त्यांचीच रुपे दातारांनी माधवराव व बळवंतराव यांच्या नावाने योजली आहेत. बळवंतराव सर्वसामान्य बुद्धीचा असल्याने रहस्य ताबडतोब त्याच्या लक्षात येत नाही. या कथा शेरलॉक होम्सच्या कथांची भाषांतरे नाहीत. शेरलॉक होम्सच्या धर्तिवर केलेल्या या स्वतंत्र रचना आहेत. गो. ना. दातार मुंबईत राहिलेले असल्यामुळे त्यावेळचे वातारण बरोबर उल्लेखिले आहे. कॉनन डॉयल यांनी शेरलॉक होम्सवर ५९ कथा लिहिल्या. पण येथे गो. ना. दातारांनी फक्त तेराच कथा लिहिल्या आहेत. प्रत्येक कथेत रहस्याचा उलगडा कथेच्या शेवटी होतोच. या कथा मुंबईत व कोकणातील राजापूर येथे घडतात त्यामुळे शेरलॉक होम्सच्या कथेपेक्षा या कथा लोकांना जास्त आवडतात. कारण त्या आपल्या घरातीलच वाटतात. चातुर्यकथांची आवड असणाऱ्या वाचकांना भारतीय वातावरणातील या चातुर्यकथा नक्कीच आवडतील.श्री. गो. ना. दातार हे माझ्या कुमारवयात मनावर जबरदस्त ठसा उमटवून गेलेले कादंबरीकार. त्यांच्या कांदबऱ्या म्हणजे कमालीची रंजकता कल्पकता. वाचकाला खेचून नेणारी रहस्यमयता अद्भुत घटनांचा अखंड ठसठशीत प्रवाह व्यक्तीचित्रणे चित्रात्मक शैलीतील वर्णने आणि प्रौढ पण रसाळ भाषा यांचा एक मनोहर मिलाफ दातारांच्या कादंबऱ्यात झालेला आहे. घरात जवळपास वा वाचनालयात उपलब्ध होणाऱ्या त्यांच्या सर्व कादंबऱ्या मी शोध घेऊन वाचल्या; पण कालिकामूर्ती व बंधुद्वेष अधिक आवडल्या. आपल्या नित्य जीवनातून एका रंगीबेरंगी विश्वात आपल्याला नेण्याचे या कादंबऱ्यांचे सामर्थ्य असाधारणच आहे. रेनॉल्ड्स यांच्या कादंबर्यांवरुन या कादंबऱ्या रुपांतरीत केलेल्या आहेत हे पुढे केव्हा तरी मला कळले. काहीच बिघडले नाही. परस्थतेचा वास देखील या लेखनाला कधी आला नाही. उत्तम रुपांतर ही देखील एका मर्यादेत; पण नवनिर्मितीच असते. मराठी कादंबरीच्या विकासात दातारांचे ऋण कोणी ना मानो; मी मात्र वाड्.मयीन व्यवहाराकडे वाचकाला वाहून नेणारा एक प्रकांड साहित्यकार म्हणून त्यांना खूप मानतो. रहस्यकथांत रस असणाऱ्यांसाठी दातारांनी हा अमोल खजिनाच निर्माण करुन ठेवला आहे.- वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.