चेटकीण ही कादंबरीविविध प्रकारच्या गूढतेने खच्चून भरलेली आहे. या कादंबरीतील अनेक प्रसंग आपल्या वास्तविक जीवनात घडल्याचे आपण ऐकलेले असते; पण बघितलेले किंवा अनुभवलेले नसते. नेमकी हीच प्रचीती या पुस्तकातून येते. या कादंबरीला आभासी विश्वाची एक मुक्त सफरच म्हणावी लागेल. गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी वास्तू. त्या वास्तूत अनाकलनीय घटना घडतात. या सर्व घटना मानवाच्या आकलनापलीकडे आणि आवाक्याबाहेरच्या आहेत. या वास्तूत एक एक व्यक्ती त्या अनाकलनीय शक्तीला कशी सामोरी जाते आणि कशी गडप होत जाते; पुढे असे घडणार आहे असे माहीत असूनसुद्धा! तर काही व्यक्ती सहीसलामत सुटतात आणि ती वास्तू पवित्र होते पिशाच्च मुक्त होते.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
*COD & Shipping Charges may apply on certain items.