*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹160
₹170
5% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
कोणतीही व्यक्ती ‘वडील’ बनू शकते पण डॅड होण्यासाठी ती खास व्यक्तीच असावी लागते.वडील आणि मुलगे यांच्या आयुष्यातील कित्येक घटना चिकन सूप फॉर द फादर सन सोल मधून मांडण्यात आल्या आहेत. मुलाचा जन्म बालपण किशोरावस्था तारुण्य प्रौढावस्था ज्येष्ठ नागरिकत्वाची अवस्था हे आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे आणि त्या टप्प्यां दरम्यानच्या ही काही अवस्था यांचे चित्रण हे पुस्तक करते. जीवन यात्रा सुरू असताना वडील आणि मुलगा एकमेकांसमवेत कसे जगत असतात ते यात मांडले गेले आहे. आपल्या मुलाला बघेपर्यंत एका पुरुषाला आपण वडील बनण्याची इच्छाच नव्हती. ती कथा आपण वाचलीच पाहिजे. कारण काही क्षणांतच त्याचा आयुष्याकडे आणि डॅड म्हणून आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचाच बदलून गेला. वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या एका मुलाला आपल्या सावत्र वडिलांमध्ये आपले वडील सापडल्याची हृदयस्पर्शी कथा ही या पुस्तकात आहे. सासरा आणि जावई यांच्या मध्ये अशा प्रकारच्या स्नेहबंधाची अपेक्षा नसते. पण त्यांच्यातील प्रेम आणि आदर यांविषयीची कथाही आपल्याला वाचावयास मिळते. आपल्या वडिलांकडे पाहणारी आणि त्यांच्या उदाहरणातून शिकणारी मुले आपल्या बालपणीच्या आणि आपल्या डॅडशी असलेल्या संबंधांच्या कथा सांगणारे वडीलही आपल्याला इथे भेटतात. या कथा स्फूर्तिदायक आहेत. आयुष्याच्या चढ-उताराच्या काळात काम करणाऱ्या पुरुषांच्या आणि मुलांच्या कथा आपल्याला वेगळीच अंतर्दृष्टी देऊन जातात. त्या काळात त्यांनी कशी वाटचाल केली आणि एकमेकांशी असलेल्या नात्यामुळे ते अधिक चांगले कसे बनले तेही आपल्याला यांपैकी काही कथांमधून दिसते. वडील आणि मुलगा यांचे नाते ज्यांच्या हृदयाला खोलवर भिडलेले आहे त्या सर्व घटकांच्या दृष्टिकोनातून याना त्याचा वेध घेतला गेला आहे. या प्रभावी आणि मर्मभेदक कथांमधून वडील मुलगे आजोबा आया पत्नी या सर्वांच्या नजरेतून हे नाते मांडले गेले आहे. जॅक कॅनफिल्ड आणि मार्वâ व्हिक्टर हॅन्सन हे प्रस्थापित राष्ट्रीयवत्तेâ आणि लेखक आहेत. न्यूयॉर्वâ टाइम्सच्या उत्तम खपाच्या चिकन सूप फॉर द सोल या मालिकेचे ते निर्माते आहेत. डोरोथीफर्मन आणि टेड स्लावस्की यांच्या वैवाहिक जीवनाला ३५ वर्षे उलटून गेली आहेत. सिंथेसिस सेंटर आणि ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या अॅमहस्र्ट येथील शैक्षणिक संघटनेत गेली कित्येक वर्षे ते एकत्रित काम करत आहेत. चिकन सूप फॉर द मदर अँड डॉटर सोल आणि चिकन सूप फॉर द सोल सेलिब्रेटिंग मदर्स अँड डॉटर्स या पुस्तकांच्या डोरोथी फर्मन या सहलेखिका आहेत.