*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹126
₹145
13% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
रूढ अर्थाने सौभाग्यकांक्षिणी नाटक वाटावे असे हे नाटक नाही. त्याला सुसूत्र असे जबरदस्त कथानक नाही फार मोठे आघात नाहीत कसली गुंतागुंत नाही आडवळणे नाहीत अनपेक्षित धक्के नाहीत भावव्याकुळता नाही दिपून जाण्याजोगे काही नाही. तुफान हास्यकारक असेही काही नाही. सीध्यासाध्या मध्यमवर्गीयांच्या सरळ रेषेतल्या आयुष्यात ते कुठे घडते? नाटक जीवनाचा आरसा असतो असे आपण सवयीने म्हणतो एवढेच. अन्यथा आरशात दिसत नाही तेच बरेचदा आपल्या नाटकांतून बघायला मिळते. मात्र सौभाग्यकांक्षिणीचे गहिरे वास्तव पाहताना आपले किंवा आपल्या मित्राचे वा शेजाऱ्याचेच चित्र पाहत असल्याचा भास होतो. म्हणूनच सौभाग्यकांक्षिणी हे नाटक नाहीच. एका विवाहेच्छू मुलीला आलेला तो एक अनुभव आहे. प्रकट करायला कमालीचा कठीण असा. लपवून ठेवावा किंवा लपवायलाच हवा असा वाटणारा आणि तरीही बेडरपणे सांगितला गेलाला विदारक सत्याचा अंतर्मुख करणारा अनुभव. - कमलाकर नाडकर्णी