*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹278
₹299
7% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
वेगवेगळ्या दिग्गज कलावंतांच्या चंदेरी दुनियेतील संघर्ष आणि कारकीर्दीवर प्रकाश टाकणारे पुस्तक म्हणजे चित्रकर्मी हे पुस्तक. चित्रपटसृष्टीतल्या काही दिग्गज कलावंतांच्या गोष्टी या पुस्तकात आहेत. यात दुर्गा खोटे राजा परांजपे शरद तळवलकर गणपत पाटील श्रीराम लागू रमेश देव किशोर प्रधान राजशेखर शशिकला दादा कोंडके विजू खोटे जयश्री गडकरी विनय आपटे सदाशिव अम्रापूरकर लक्ष्मीकांत बेर्डे स्मिता पाटील यांसारख्या तीस कलाकारांच्या जीवनातील संघर्ष लेखरूपात आलेला आहे. लेखक आशिष निनगुरकर यांनी या कलाकारांची कारकीर्द थोडक्यात आणि वाचनीय शब्दांत मांडली आहे. या मान्यवर कलावंतांची माहिती बारकाईने देण्याचा प्रयत्न लेखकाने या पुस्तकात केला आहे. त्यांचा मोजका पण महत्त्वपूर्ण प्रवास या पुस्तकात मांडला आहे. लेखकाविषयी : लेखक आशिष निनगुरकर हे सातत्याने चित्रपटविषयक लिखाण करत असून ते एक कवी गीतकार पटकथाकार आहेत. पाचहून अधिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले असून लघुपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. तसेच चित्रपटांमधून अभिनय त्यांनी केला असून अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला आहे.