*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹146
₹175
16% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
छायाचित्र कलेवर सोप्या मराठीत; सुंदर नेमक्या शब्दांत भाष्य करत वाचनीय केलेलं अर्चना देशपांडे जोशी यांचं “क्लिक ट्रिक” हे पुस्तक आहे. ‘छायाप्रकाशाचा खेळ म्हणजे प्रकाश-रंगातून रंगलेली स्मरणचित्रे’ असं म्हणत फोटोंचं आठवणींशी निगडित असलेल नातं सांगत नमनालाच ‘सावलीच्या छटा’ फार छान मांडल्या आहेत.फोटो कुठे कुठे असतो हे मांडत ‘फोटोग्राफर चित्रकलेतून कल्पनेला आकार देतो’ असं सांगत ‘रस्त्यावरून फिरणाऱ्या वाहनांकडे नीट निरखून बघा विविध मानवी चेहरे-भाव दिसतात’ म्हणत पुढे त्यांनी गमतीशीर टीप्पणी केलीए. ती अशी - एस. टी. हिरमुसलेली रिक्षा नाक उडवणारी ऍम्बेसिडर मोकळेपणाने हसणारी... काय नेमकं भाष्य फोटोग्राफिक नजरेचं!‘फोटो काढण्यापूर्वी गरज शोधक नजरेची’ असं सांगत प्रवेशद्वाराच्या कमानीतून दिसणार्या ताजमहालचं उदाहरण देत तो फोटो बघायची उत्सुकता वाढवलीए. ‘उसळत्या समुद्राला क्षितिजाची पार्श्वभूमी फोटोत नसेल तर भकास वाटेल’ ही टिप्पणी विविध कोनांतून आकारातूनTriangle कम्पोझीशन दिसणे हा त्या फोटोग्राफरच्या कल्पनाशक्तीचा अविष्कार असतो. चित्रकारांनी काढलेल्या चित्राचे अवलोकन करणे हे उत्तम फोटोग्राफी करण्यसाठी मार्गदर्शक ठरते. फोटो काढण्यापूर्वी फोटो का काढत आहोत कशाचा काढत आहोत याचा विचार हवाच. फोटोग्राफीचा छंद हृदयातून जन्माला आला विचारातून साकारला गेला तर येणारा प्रत्येक फोटो मनाची सतार झंकारत जाईल असे अप्रतिम मुद्दे अर्चनाने मांडलेत. फोटोंना कविता सुचणे फोटोंच्या वेगवेगळ्या वेळा असे छायाचित्र-कलेशी संबंधित अनेक रंग पुस्तकात मांडले आहेत. असे हे फोटो बोलकं पुस्तक फोटोत रस असलेल्यांनी मनात फोटो काढून ठेवावा असं हे अर्चनाचं “क्लिक ट्रिक”.- श्री. सुधीर गाडगीळ नामवंत मुलाखतकार आणि लेखक