College To Corporate via Interview
Marathi


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

करिअरची सुरुवात होते ती पहिल्या नोकरीतून... आणि या कॉर्पोरेट जगतात प्रवेश करायचा तर पहिली पायरी असते इंटरव्ह्यूची. नोकरीत उमेदवार निवडताना काय बघितलं जातं? बायोडेटामध्ये काय काय लिहावं? मुलाखतीची तयारी कशी करावी? इंटरव्ह्यूमध्ये नेमकं काय विचारलं जातं? कसं वागायचं इंटरव्ह्यूमध्ये? आजवर केलेल्या अभ्यासातलं विचारलं जाईल की अवांतर काही? याचं मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे. कॉलेजचे शिक्षण संपवून नव्याने कॉर्पोरेट जगात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाने नोकरीसाठी करिअरसाठी स्वतःला कसं तयार करावं त्यात यशस्वी कसं व्हावं यासाठी वाचायलाच हवं असं पुस्तक म्हणजे ''कॉलेज टू कॉर्पोरेट व्हाया इंटरव्ह्यू'' लेखकाविषयी : विनोद बिडवाईक हे मानव संसाधन (ह्यूमन रिसोर्स) आणि व्यवस्थापन क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यांना तब्बल २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव ह्या क्षेत्रात आहे. मोठमोठया भारतीय आणि बहुराष्ट्रीय उद्योगांमध्ये त्यांनी उच्चपदावर काम केलेले आहे. ते सध्या एपी ग्लोबले आणि सकाळ मीडिया ग्रुपमध्ये ग्रुप डायरेक्टर-एचआर म्हणून काम करत आहेत. मनुष्यबळ विकास मानव संसाधन बिजिनेस स्ट्रॅटेजी टॅलेंट मॅनेजमेंट संस्थेची पुनर्रचना एच आर परिवर्तन नेतृत्व विकास यासारख्या जटिल विषयावर त्यांनी काम केलेले आहे. त्यांची आतापर्यंत ३ मराठी आणि ४ इंग्रजी पुस्तके लिहिलेली आहेत. व्यवस्थापन जर्नल्स आणि मासिकांमध्ये ते नियमितपणे लिहितात. ते बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन एनआयपीएम आणि एनएचआरडीचे आजीवन सदस्य आणि वेगवेगळ्या मंचांवर नियमित वक्तेआहेत. ते इंग्रजी आणि मराठी दैनिके आणि मासिकांमध्ये नियमित स्तंभलेखकही आहेत.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details