जगात प्रचंड यश कसे मिळवावे याविषयी लेखक तज्ज्ञतेने भाष्य करतात. काही साधनांच्या तंत्रांच्या साहाय्याने सराव करून त्यांना आचरणात आणून कोणतीही व्यक्ती अधिक सर्जनशील होऊ शकते हे लेखकाला माहीत आहे. या पुस्तकात त्यांनी निर्मितीक्षम कल्पनांचा प्रवाह तयार करण्यास प्रारंभ करण्यासाठी विविध कसोट्यांवर उतरलेली 21 तंत्रे सांगितली आहेत. तुम्ही त्यांचा लगेच उपयोग करू शकता. सर्जनशीलतेचे तीन महत्त्वाचे खटके कसे दाबावेत; समस्या सोडवण्यासाठी यंत्रणांमध्ये सुधारणा करण्यासाठी कल्पकतेने नवीन उत्पादने तयार करण्यासाठी आणि पणनाच्या नवीन बाजू शोधण्यासाठी शून्याधारित विचार करणे विचारविमर्श पार्श्वविचार आणि नाममात्र गट तंत्र यांचा उपयोग कसा करावा; उत्तम सुसंस्कृत उपाययोजना तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारावेत आणि आणखीही बरेच काही. स्वतःच्या अंतःप्रेरणेशी संबंधित बुद्धिमत्तेच्या स्रोताचा उपयोग करून घेण्यासाठी करिअरमध्ये परिवर्तन घडवून आणणारे हे पुस्तक अवश्य वाचलेच पाहिजे.